पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृती पाखरे ७ : धाब्यावरील गमतीजमती

इमेज
आमच्या ओसरीला (बैठक खोली) लागूनच धाब्यावर जाण्यासाठी एक लाकडी जिना होता. बारा-पंधरा पायऱ्या चढून गेल्यावर जिना संपतो त्या ठिकाणी तीन चार फुटाची जी चौरस जागा होती तिला आम्ही 'जिन्याची ताटली' म्हणत असू. तिच्या दोन्ही बाजूला धाब्यावर जाण्यासाठी दरवाजे होते. जिन्याची ताटली व माझा असा खास जिव्हाळ्याचा संबंध होता. शालेय जीवनात अभ्यासासाठी लागणारी शांतता व एकाग्रता मला हिच्या सान्निध्यात लाभत असे. माझ्या प्रत्येक परिक्षेच्या पूर्वतयारीची साक्षीदार म्हणजे ही ताटली होय. हिच्या संगतीत राहिल्यामुळे मी नेहमीच उच्चतम श्रेणीत उत्तीर्ण होत गेली. या जिन्याच्या वर अजून एक उघडा जिना होता व तशीच जिन्याची ताटली होती. त्याचा काय उद्देश होता माहित नाही पण फक्त आमच्या धाब्यावर असा जिना होता. त्यामुळे तिथे उभे राहिल्यावर 'आज मै उपर' ही भावना मनात असायची. ह्या ताटलीत आम्हा बच्चे कंपनीचा गप्पांचा फड रंगत असे. याच्या दोन्ही बाजूच्या उतरत्या भिंतींचा उपयोग आम्ही घसरगुंडी म्हणून करत असू. त्याच्या खडबडीत पृष्ठभागामुळे प्रसंगी आमचे कपडेही फाटत.  उन्हाळ्याच्या सुटीत आम्हा मुलांना धाब्याइतकी प्रिय जागा...