पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृती पाखरे ८ : चूलमाय

इमेज
हो  चूलमायच  ती.  पोटात जाळ घेऊन लेकरांसाठी भाकरी भाजते तिला मायच म्हणतात ना. किती कोंडी करतोय ना तिची आपण ! तिच्या तिन्ही बाजू बंद करून एकुलत्या एक उघड्या बाजूत जळती लाकडे घालून तिचे तोंड बंद करतो. आणि  मग तिच्यातल्या धगधगत्या जाळावर आपण आपली भाकरी भाजून घेतो.  आणि हे कर्मही एका मायलाच करावे लागते, नाही का?  मला अजूनही आठवते, आमच्या स्वयंपाक घरातील एका कोपऱ्यात जराशा उंचवट्यावर मांडलेली चूल आणि त्या चुलीच्या कुशीत असलेली छोटीशी उलचूल (शेगडी). सकाळी दिवस उगवण्याच्या आधीच हिच्या पोटातला शांत झालेला निखारा व त्याची राख काढून तिला शुचिर्भूत करण्याचे काम घरातील गृहिणी करत असे. ठराविक पांढर्‍या मातीच्या पाण्याचा बोळा तिच्यावर फिरवून घेत असत म्हणजे चूल सारवली जात असे. त्यानंतर घरातली गृहिणी शुचिर्भूत होऊन तिला हळद-कुंकू लावून पूजा करत असे व तिच्या पुढ्यात छोटीशी रांगोळीही काढे. त्यानंतर तिच्या पोटात रॉकेलमध्ये भिजवलेल्या गवरीचे खांड ठेवत असे. ते पेटवून त्यावर दोन चार लाकडे रचत असे. लाकडं रसरसून पेटली म्हणजे त्यावर चहाचं आधण ठेवलं जाई. घरात दहा-पंधरा माणसे, त्याबर...