पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीपाखरे 13 : खानदेशचा बैलपोळा

इमेज
आज श्रावण अमावास्या. सकाळी सकाळी मन वाऱ्याच्या वेगानं खानदेशातल्या जुन्या धुळ्यातील माहेरच्या घरी धावत गेले. आज पोळ्याचा सण. लहानपणी बैल केव्हा येणार याची दहावेळा वडिलांजवळ चौकशी करत असू. "आता बैल काय करत असतील? त्यांना शेतातून घरी यायला किती वेळ लागेल?" अशा प्रश्नांची लांबलचक भेंडोळी वडिलांपुढे टाकत असू. "सकाळी नानाभाऊ, लुक्या यांनी बैलांना मनसोक्त पाण्यात डुंबू दिले. त्यानंतर त्यांना साबण लावून स्वच्छ आंघोळ घातली. भरपूर चारा, वैरण खाऊ घातले. मानावर जोखड ठेवून कुठल्याही कामास जुंपले नाही. चार वाजता बैल घरी पोहोचतील", अशी माहिती वडिलांकडून आम्हाला मिळत असे. मग चार कधी वाजतील हे समजण्यासाठी घड्याळावर सतत लक्ष ठेवून असत. बरोबर चार वाजता आठ-दहा बैल व एखाद्या तरण्याबांड गोऱ्ह्यासहित चार पाच सालदार अंगणात येऊन उभे राहत. त्यांच्या येण्याची दादांनी सांगितलेली वेळ किती अचूक होती याचे आश्चर्य वाटत राही. बरोबर तीनच्या भोंग्याला शेतातून निघण्याची सूचना दादांनी सालदारांना केलेली असे. बैल अंगणात आल्याबरोबर पायरीवर एक लांबलचक खाट ठेवली जाई. त्यावर एक सतरंजी अंथरून गहू पसरले जा...