पाहुणे - रावळे (भाग 5)
फेसबुकवर मैत्रिणींनी काढलेले पक्ष्यांचे फोटो बघून मी दोन इच्छा व्यक्त केल्या होत्या. एक म्हणजे मुनियाचं बाळ पाहायला मिळावं आणि दुसरी म्हणजे वर्षातून एकदा येणाऱ्या 'गोरली' (Rose finch) चं लवकर दर्शन व्हावे. म्हणतात ना, 'भगवान देता है तो छप्पर फाडके देता है'। तसंच काहीसं आज माझ्या बाबतीत घडले. आज रविवार असल्यामुळे सकाळी जरा उशिराच उठले. काही वेळेस जरा समंजस माणसाप्रमाणे वागायला हवे. माझ्या खुडबुडीने नवऱ्याची झोपमोड होऊ नये म्हणून निमूट अंथरूणावर लोळत पडले होते. साधारण आठ वाजता आयता चहाचा कप हातात आला. एक मात्र खरे, पाय जायबंदी झाल्यामुळे नवऱ्याकडून सेवा करण्याची आयती संधी चालून आली. हं तर मी काय म्हणत होते? चहा पीत असताना नेहमीच उंबराच्या झाडावर माझी नजर टेहळणी करत असते. पूर्व दिशेला असलेल्या उंबराच्या झाडावर येणारा पक्षी पटकन लक्षात येत नाही. मगर हमारी पारखी नजर का कमाल देखो। साधारण बुलबुलाच्या आकाराएवढा तो पक्षी डोक्याला गुलाल फासून आला होता. 'अरेच्चा, हा तर Rose finch!' असे ओरडत मी ओट्याच्या दिशेने धावत सुटले अन् धावता धावता म्हणजे...