पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृती पाखरे 3 : जातं

इमेज
हे महाशय एका महिन्यापूर्वीच आमच्या घरात दाखल झाले. धुळ्याहून ३५० कि. मी. चा प्रवास माझ्या पायाशी बसून मजल दरमजल करत ते पुण्यात आले. सासऱ्यांनी जमवलेल्या मायेपैकी हे एक.  भंगारात जाण्यापूर्वी याला मी मोठ्या प्रेमाने उचलून माझ्या गच्चीवर स्थान दिले.  याला बघितल्यावर बालपणीच्या आठवणी मनात रुंजी घालू लागल्या.  ाझ्या माहेरचं घर ऐसपैस तीन खणी रुंदीचं व १०० फूट लांबीचं. ओटा,  बैठकीची खोली, मधलंघर, स्वयंपाकघर ,  मागचं दार अशा भागात ते विभागले होते.  मागच्या दारी एका खणात भिंतीलगत दोन जात्यांना (एक मोठे व एक छोटे) अचल स्थान दिले होते. त्यामुळे किमान तीन जणी याच्या दिमतीला बसू शकत. याला घास भरवण्यापूर्वी हळदी-कुंकू लावून सुवासिनी पूजा करत. पुरणपोळीचे किंवा शेवयांचे गहू दळण्याचा मान मोठ्या जात्याला मिळत असे. गहू धुऊन, उपसून, सावलीत वाळत घालत. त्यानंतर एक जण त्याच्या मुखात मूठभर धान्याचा घास भरवत व दुसऱ्या हाताने दांड्याला धरून दोघी-तिघी जणींसमवेत संथ लयीत ओढत असत. त्याचबरोबर आनंदाने ओव्याही म्हणत. कदाचित ह्या ओव्या म्हणजे जाते ओढत असतानाच्या होणाऱ्या कष्टा...

स्मृती पाखरे 2 : गीताआज्जीचा वाढदिवस

इमेज
खूप वयोवृद्ध आहे ती. पण तरीही सर्वांना हवीहवीशी. तिने दिलेली शिकवण ज्यांनी आचरणात आणली त्या सर्वांच्या जीवनाचं सार्थक झालं, म्हणूनच या वयातही तिला सर्वजण डोक्यावर घेऊन नाचतात असे म्हणायला हरकत नाही. तिचं वय तसं फार नाही, फक्त 5000 वर्षापेक्षा अधिक आहे असे जाणकार लोक सांगतात. तिचा जन्म झाला कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर. तिची जन्मदात्री छे छे! जन्मदाता प्रत्यक्ष जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण.  ओळखलं ना कोण ती?  हो तीच ती गीताआज्जी.  सर्वजण तिला भगवद्गीता असेही म्हणतात. पहिल्यांदाच स्त्री एेवजी पुरुषाने जन्माला घातलेले हे अपत्य. तिच्या प्रसववेणांचा भार अर्जुनाने सुद्धा सहन केला हं. हिची माझी ओळख झाली ते साल असावं 1978. तेव्हा माझं वय होतं फक्त दहा वर्षे.  परम पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय केंद्रात हिची तोंडओळख झाली. दर महिन्याला घरी येणाऱ्या तत्त्वज्ञान मासिकातून तिच्याविषयी पू. दादा भरभरून बोलत. त्यातल्या दोन-तीन गोष्टी माझ्या बालमनावर चांगलाच ठसा उमटवून गेल्या. 1. फळाची अपेक्षा न करता काम करीत रहा. 2. काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे. 3. स...

स्मृती पाखरे 1 : Miss शेवंती

इमेज
स्मृती पाखरे 1 ही आहे मिस शेवंती. पिवळीधमक, हळदीने माखलेली, जणू बोहल्यावर चढलेली. हिचा माझा बंध जुना.  कोणाशी, कुठे, कसा, केव्हा ऋणानुबंध जुळतो हे आपण काहीच सांगू शकत नाही.  मार्गशीर्ष महिन्यात नवमीच्या दिवशी आमच्या घरी गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात व्हायची. भल्या पहाटे शांताराम बापू (गुरुजी) घरी यायचे. यथासांग दत्ताच्या प्रतिमेची पूजा करून वाचनाला आरंभ करायचे. आई-दादा भक्तिभावाने श्रवण करायचे. आरतीच्या वेळी आम्हा भावंडांना साखर झोपेतून उठवायचे. आम्हीही डोळे चोळत आरतीचा कागद हातात घेऊन ताला-सुरात आरतीचे स्वर आळवू लागत.  श्री गुरुदत्तराज मूर्ती । ओवाळीतो प्रेमे आरती  ती आरती म्हणताना एक वेगळाच उत्साह अंगात संचारत असे. आरती पाठोपाठ, पुष्पांजली ही तुला अर्पितो।  श्रीगुरू यतिराया  तेव्हा म्हटली जाणारी ही पुष्पांजली अजूनही स्मरणात आहे. आता तुम्ही म्हणणार, मिस शेवंतीच्या ऋणानुबंधाविषयी सांगता सांगता  हे काय भलतेच सांगत आहे.  ऐका ना, तेच तर सांगते. गुरुदत्ताच्या फोटोसाठी रोज एक बट शेवंतीचा हार आणला जाई. दुसऱ्या दिवशी निर्माल्य झालेल्या या...