पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृती पाखरे ९ : उखळ -मुसळ

इमेज
स्मृतीपाखरे ९ : उखळ-मुसळ  'उखळ पांढरे होणे' हा वाक्प्रचार शाळेत असताना पाठ केलेला आपणा सगळ्यांना आठवत असेलच. परंतु आजच्या पिढीला हे 'उखळ' म्हणजे काय हे माहितही नसणार. स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांमुळे याच्याशी ताकापुरता संबंध आहे असे म्हणायला हरकत नाही.  उखळ पांढरे होणे म्हणजे भरपूर संपत्ती असणे.  उखळ म्हटले म्हणजे मुसळ येणारच. एकमेकांशिवाय ते अपूर्णच. उखळ-मुसळ नावातील साधर्म्यामुळे दोघे आवळी जावळी असल्याचा भास होतो परंतु दोघे अगदी विभिन्न स्वभावाचे व रंगरूपात जरासेही साम्य नसलेले. उखळाची खडबडीत दगडाची काया तर मुसळ म्हणजे खैर,बाभूळ वा शिसमच्या टणक काष्ठातून निर्माण केलेली एक सुबक कलाकृती. एक हळुवारपणे घाव घालतोय तर दुसरा तितक्याच मायेने तो सहन करतो. ह्या दोघांच्या देवाणघेवाणीतून कधी लाल मिरच्यांचे भुकटीत रूपांतर होई तर कधी भगर (वरई) व राळेच्या अंगावरचे नाजूक  सालपट गळून पडत असे. मला आठवते, आमच्या मधल्या घरात स्वयंपाकघराच्या भिंतीलगत एक दगडी उखळ होते. उखळ म्हणजे दगडाची एक भली मोठी वाटीच जणू. वरून जेवढी दिसे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जमिनीच...