पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पंढरपूर - विठूदर्शन

इमेज
'सुखाचे आगर भक्तांचे माहेर'   'ओढ लागे जीवा तेचि पंढरपूर' असे हे पंढरपूर. या पंढरपूरला जाण्याचा मला चार वेळा योग आला. पहिल्यांदा गेले सासू-सासऱ्यांसोबत. दुसर्‍यांदा गेले आई-वडिलांसोबत. दोन्ही वेळा त्यांना काही त्रास होऊ नये या काळजीतच माझे दर्शन पार पडले. परत दर्शनाचा योग येईल अशी कधी अपेक्षाही धरली नव्हती. परंतु म्हणतात ना एखादी व्यक्ती जीवनात येण्याचा किंवा देवदर्शन होण्याचा हा ही एक योग असावा लागतो. त्याचे असे झाले.  माझी मोठी बहिण कल्पनाताई. तिने चातुर्मासात लहानपणी मंदिरात ऐकलेला 'भक्तिविजय' हा ग्रंथ स्वतः वाचायला घेतला. त्यात तिला नामदेव, चोखोबा, दामाजीपंत, कान्होपात्रा जनाबाई अशा अनेक संतांचा परिचय झाला. ह्या सर्वांचे चित्त ज्याच्या चरणी लागले होते त्या पांडुरंगाच्या दर्शनाची तिला ओढ लागली. एके दिवशी तिने फर्मान सोडले, "वंदना, आपल्याला पंढरपूरला जायचे आहे, तेही नवरात्रात." कारण दसरा-दिवाळीच्या दिवशी ह्या सावळ्या विठ्ठलाला अनेक सुवर्ण व रत्नजडित अलंकारांनी सजवले जाते. तेव्हाचं त्याचं साजिरे-गोजिरे रूप खूप छान असते, असे बऱ्याच जणांकडून...

माझी वारी

इमेज
मी कोथरूडला राहत असतांना ज्ञानेश्वर-तुकाराम माऊलींच्या पादुका पुण्यात जेव्हा जेव्हा यायच्या तेव्हा तेव्हा नवऱ्याला ऑफिसमधून घरी यायला वेळ लागायचा. रस्ते बंद असल्यामुळे  इकडून, तिकडून, लांबचा वळसा घालून  घरी यावं लागायचं. त्यामुळे मी वैतागायची. उगाच रस्ते बंद करतात, पाण्याची कपात करतात, गोंधळ घालतात, घाण करतात वगैरे वगैरे  पण असं म्हणतात, 'गंगेच खरं स्वरूप बघायचं असेल तर गंगोत्री जवळच गेलं पाहिजे.' तसंच वारीच खरं रुप बघायचं असेल तर वारीमध्येच गेलं पाहिजे. 'आळंदी ते पुणे' हा वारीचा पायी प्रवास मी दोन वेळा अनुभवला. त्याविषयीचे अनुभवकथन मी आज करत आहे. माझ्यात देवाची आवड निर्माण झाली ती माहेरच्या संस्कारांमुळेच. सव्वाशे/दीडशे वर्षापूर्वीचा राममंदिराचा वारसा आम्हाला मिळाला आहे. तिथे रामजन्म, कृष्णाष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होतो. अशाच वातावरणात वाढलेल्या मुलीला पांडुरंगाचा मोह झाला नाही तर नवलच. साधारण 2011/12 मध्ये मला  'आळंदी ते पुणे' ह्या वारीत सहभागी  होण्याचा योग आला. त्याला निमित्तही तसेच घडले. आमची एक काकू नेहमी वारी करत असते. तिच्याजव...