स्मृती पाखरे 2 : गीताआज्जीचा वाढदिवस
खूप वयोवृद्ध आहे ती. पण तरीही सर्वांना हवीहवीशी. तिने दिलेली शिकवण ज्यांनी आचरणात आणली त्या सर्वांच्या जीवनाचं सार्थक झालं, म्हणूनच या वयातही तिला सर्वजण डोक्यावर घेऊन नाचतात असे म्हणायला हरकत नाही. तिचं वय तसं फार नाही, फक्त 5000 वर्षापेक्षा अधिक आहे असे जाणकार लोक सांगतात. तिचा जन्म झाला कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर. तिची जन्मदात्री छे छे! जन्मदाता प्रत्यक्ष जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण.
ओळखलं ना कोण ती?
हो तीच ती गीताआज्जी. सर्वजण तिला भगवद्गीता असेही म्हणतात. पहिल्यांदाच स्त्री एेवजी पुरुषाने जन्माला घातलेले हे अपत्य. तिच्या प्रसववेणांचा भार अर्जुनाने सुद्धा सहन केला हं.
हिची माझी ओळख झाली ते साल असावं 1978.
तेव्हा माझं वय होतं फक्त दहा वर्षे.
परम पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय केंद्रात हिची तोंडओळख झाली. दर महिन्याला घरी येणाऱ्या तत्त्वज्ञान मासिकातून तिच्याविषयी पू. दादा भरभरून बोलत. त्यातल्या दोन-तीन गोष्टी माझ्या बालमनावर चांगलाच ठसा उमटवून गेल्या.
1. फळाची अपेक्षा न करता काम करीत रहा.
2. काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे.
3. सगळ्यात महत्त्वाचं कोणाकडून फुकट घेणार नाही.
धुळ्याच्या जे.आर. सिटी स्कूलमध्ये एम. एल. वाणी सर होते. त्यांनी देववाणीतील गीताआज्जीचा उपदेश आम्हा मुलांकडून मुखोद्गत करून घ्यायला सुरुवात केली. 12, 15, 16, 2, 11असे एकेक अध्याय आम्हा मुलांना मोठ्या आत्मीयतेने शिकवत. पुढे स्वाध्याय केंद्रातील बंधू-भगिनींना गीतेची संथा दिल्याचे आठवते.
तर अशा या गीताआज्जीचा वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणा प. पू. दादांनीच दिली.
मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध एकादशीला सकाळी आठ वाजता शहरातून शोभायात्रा निघत असे. त्यात जवळपासच्या खेड्यांतले अनेक स्वाध्यायी सहभागी होत असत.
गीतामाँ को वंदन करने विश्व यहाँ पर आया है।
एक पुजारी पुजा करने द्वार तिहारे आया है।
ऐकुनी गीता गान मधुर मन।
विसरे जग जंजाळ।
गीता ज्ञानाचे भांडार ।।
असे भजन, भावगीते व श्लोक म्हणणारे स्वाध्यायी बघून मनात एक वेगळीच चेतना निर्माण होत असे.
त्यानंतर एका स्वाध्याय केंद्रावर गीतेच्या अठरा अध्यायाचे पठण होत असे.
आलेले सर्व बंधू-भगिनी आपल्या जवळची शिदोरी एकत्र बसून गीताआज्जीच्या वाढदिवसाच्या मेजवानीचा लाभ घेत असत.
अशी ही गीताआज्जी. हिची प्रेमळ शिकवण अनेक भाषांतून सर्व विश्वात पोहोचली आहे.
अनेकांनी आपल्या हृदयात हिला आईचे स्थान दिले आहे.
प. पू. दादांनी आम्हाला गीतामृतम पाजलं. धन्य झालो.
पण जेव्हा पुण्यातल्या एका नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीदान समारंभात गुरूजनांनी ही गीताआज्जी माझ्या लहान मुलीच्या हातात सोपवली तेव्हा अत्यानंद तर झालाच पण या भेटीचे विशेष कौतुकही वाटले. सानुल्या रूपात ही गीताआज्जी जीवनाच्या वाटेवर कायम मार्गदर्शक राहील याचे समाधान वाटले.
तेव्हा नकळत कुठूनतरी कानांत गुंजारव ऐकू येऊ लागला,
गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
अनुदिनी या गीताआज्जीला मनापासून वंदन करते.
वंदना लोखंडे
25/12/2020
---------------------------------------
खूपच छान लिहीलय गीता आज्जी बद्दल.माझ्या आज्जीचे पण नावं संयोगाने गीता आज्जीच होते.
उत्तर द्याहटवावंदना ताई उत्कृष्ट लिखाण...
धन्यवाद मनीषा 😊🙏👍
हटवावंदू, खूप अभ्यासपूर्ण लिहिलंयस! मस्त 👌🙏🌹
उत्तर द्याहटवाधन्यवाद सुनिता 😊🙏
हटवाखूप छान वंदना.. किती छान लिहिले आहेस
उत्तर द्याहटवासौ मंगला लोखंडे
हटवाखूपच छान लिहिले आहे
भगवद गीता खऱ्या अर्थाने
सर्वांची आई आहे पण आजी
उपमा पण छान वाटली
खूप खूप धन्यवाद 😊🙏
हटवागीता आज्जी 🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप छान 👌👌
धन्यवाद दिप्ती 😊
हटवाअभिमानास्पद लिखाण आहे हे! बालपणी घेतलेल्या सर्व शिक्षणाची तू पूर्णपणे मांडणी केली आहे!
उत्तर द्याहटवा😊🙏
हटवाखुप छान वाचुन नवीन ज्ञानात भर पडली
उत्तर द्याहटवाछान लिहिलेस वंदना
उत्तर द्याहटवा